Pandharpur Vitthal rukhmini photo with mango (Photo Credit): Facebook

पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या आणि आपल्या सावळ्या विठूरायाचे ते मनमोहक रुप डोळ्यात सामावून घेण्यासाठी रोज लाखो भाविक पंढरपूरात येतात. ह्या भक्तांपैकीच एका विठ्ठलवेड्या भक्ताने पंढरपूराच्या मंदिराला 11 हजार आंब्यांनी सजवलं आहे. आपल्या लाडक्या विठुरायासाठी त्याने ही खास आंब्यांची आरास केली आहे. आंब्यांच्या आराशीत नटलेला ह्या विठूरायचे हे मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

आपला लाडका विठूराय नेहमीच सुंदर आणि मनमोहक दिसावा यासाठी भाविक रोज काही ना काही करत असतात, मग ते मंदिर सजवणं असो, फुलांची सजावट करणं असो, भव्य दिव्य रांगोळी असो वा अन्य काही. विठ्ठल चरणी तल्लीन होऊन नि:स्वार्थपणे प्रत्येक भाविक विठ्ठलाची मनोभावे सेवा करण्यास कायम तत्पर असतो. अशाच एका पुण्याहून आलेल्या एका भक्ताने रत्नागिरीहून आणलेल्या 11 हजार आंब्यांनी मंदिराची सजावट करण्यास सुरुवात केली आहे. मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि विनायक काची यांनी 100 कलाकारांच्या मदतीने ही सजावट केली आहे.

Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक जाहीर

या सजावटीमुळे संपुर्ण मंदिर परिसर हापूस आंब्याच्या सुगंधाने दरवळून गेला आहे. संपुर्ण मंदिर पिवळ्या-केशरी आंब्यानी नटलेला आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा हा देखील विठ्ठल चरणी लीन झालाय, असच ह्या एकंदरीत दृश्यावरुन दिसतयं.