Ajit Pawar on Mask: भाषणादरम्यान आलेली चिठ्ठी पाहून अजित पवार भडकले म्हणाले 'हा शहाणा मला सांगतोय'
Ajit Pawar |

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज व्यासपीठावरुन भाषण करताना चांगलेच संतापले. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur By Poll) प्रचारादरम्यान अजित पवार यांचे भाषण सुरु होते. या वेळी व्यासपीठावरुन जाहीर सभेत भाषण करताना एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना चिठ्ठी दिली. या चिठ्ठीत लिहिले होते 'दादा आवाज येत नाही. मास्क (Mask) काढा'. चिठ्ठी वाचली आणि अजित पवार चांगलेच भडकले. म्हणाले 'आता मी सगळ्या जनतेला सांगतो आहे 'मास्क वापरा' आणि आता हा शाहणा मला सांगतोय मास्क काढा'. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी महाराष्ट्रात ओळखले जातात. आजही त्यांच्या या स्वभावाची उपस्थितांना प्रचिती आली.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. भालके यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून (NCP) भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) तर भाजप (BJP) कडून समाधान अवताडे (Samadhan Awatade) रिंगणात आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरत भालके यांच्या प्रचारार्थ आले होते. या वेळी आयोजित सभेत अजित पवार यांनी भाषण केले.

भगिरत भालके यांच्या सभेसाठी घेतलेल्या अजित पवार यांच्या सभेला मोठी गर्दी होती. कोरोना नियम असतानाही लोकांनी केलेली गर्दी पाहता स्वत: उपुख्यमंत्र्यांनीच नियम मोडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. अजित पवार यांच्या सभेला आलेल्या अनेक नागरिकांनी मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टन्सींगचा तर पुरता फज्जाच उडाला होता. या गर्दीवरुनही पुन्हा राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, Kalyanrao Kale joins NCP: कल्याणराव काळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)

जमलेल्या गर्दीचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले असता विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. स्वत: सरकारमधील जबाबदार मंत्रीच कोरोना नियमांचे पालन करत नसतील तर सर्वसामान्य जनतेने काय करायच असे दरेकर यांनी म्हटले. तर दरेकर यांच्या आरोपाला उत्तर देताना अलपसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, निवडणूक सुरु असलेल्या ठिकाणी नियमांना काहीशी शिथीलता मिळालेली आहे. जर अचारसंहितेचे पालन झाले नसेल तर संबंदितांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.