पंढरपूर (Pandharpur) मध्ये मुलीला पळवून नेऊन लग्न केल्या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना दोरीने झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या फेसबुक वर व्हायरल (Viral Video) होत आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना मंंगळवेढा येथील भाळवणी या गावात घडली होती.भाळवणी गावात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेले होते. यानंतर संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्लाबोल करत मुलाच्या वडिलांंना मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर, मुलाच्या वडिलांना घरापासून तीन किमी अंतरापर्यंत दोरीने बांधून फरफटत नेण्यात आले आणि तिथे एका लिंंबाच्या झाडाला बांंधुन त्यांना जबर मारहाण केल्याचे समजत आहे.
व्हायरल होणार्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, गावाच्या चौकात या घटनेमुळे गोंधळ उडाला आहे, यावेळी ग्रामस्थांंनी मध्यस्थी करुन मुलाच्या वडिलांंची सुटका केली आहे,
पहा व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, गावकर्यांनी मुलीच्या वडीलांची सुटका केल्यावर या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली. या नंंतर मारहाण करणार्या नातेवाईकांंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंंदर्भात पोलिस सविस्तर तपास करत आहेत.