Devendra Fadnavis, Ajit Pawar and Eknath Shinde (फोटो सौजन्य - X/@itejasmehta)

Maharashtra CM Swearing-in Ceremony: भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (New Chief Minister of Maharashtra) म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, ताज्या वृत्तानुसार आज केवळ देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच शपथ घेणार आहेत. शिंदे आणि पवार यांच्यासमवेत फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा औपचारिक दावा केला आणि युतीच्या भागीदारांकडून पाठिंबा देण्याची पत्रे सादर केली.

विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल दोन आठवड्यानंतर आज फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारची स्थापना होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला प्रचंड यश मिळाले. 288 सदस्यांच्या सभागृहात भाजपने 132 जागा मिळाल्या. (हेही वाचा -Maharashtra CM Oath Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबई येथील आझाद मैदानावर सोहळा)

आज सुमारे 42,000 उपस्थितांसह महाराष्ट्र सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तथापी, शपथविधी सोहळ्याला 40,000 भाजप समर्थक उपस्थित राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध नेत्यांसह 2,000 VVIP साठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी 4,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा -Maharashtra Oath Ceremony: अखेर Eknath Shinde यांच्याबाबत चित्र स्पष्ट; गुरुवारी घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ- Reports)

16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन -

दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून त्यापूर्वी 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडू शकतो.