Eknath Khadse | (File Photo)

महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज बांधवांची जुन्या जाणकार मंडळींची,ओबीसीचे नवीन फळीच्या कार्यकर्त्यांची एक ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे व ओबीसी जनक्रांती परिषदचे प्रदेशाध्यक्ष मुबंई येथील अनिल महाजन हे होते. या बैठकीमध्ये नवीन फळीचे ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली मते नोंदवली. माळी,धनगर ,वंजारी, हा माधव पॅटर्न गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्र मध्ये राबवला होता. तोच पॅटर्न आता महाराष्ट्र मध्ये (नाथाभाऊ) एकनाथराव खडसे यांनी राबवावा असे काही ओबीसी कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून आले कारण स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून नाथाभाऊ यांनी अनेक वर्षे काम केले आहे. आणि नाथाभाऊ स्वतः ओबीसी असल्यामुळे त्यांना ओबीसी समाजाच्या अनेक समस्या माहीत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र मध्ये ग्रामपंचायत पासून ते खासदारकी पर्यंत पक्षाचे तिकीट मिळुऊन देऊन निवडून आणण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला शिफारस नाथाभाऊ खडसे हेच करू शकतात असे या बैठकीत सर्वांच्या बोलण्यातून आले. नाथाभाऊ म्हणजे सर्वसामान्यांना कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता आहे.आगामी काळात नाथाभाऊ खडसे हेच ओबीसी नेतृत्व मागासवर्गीयासाठी राहील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या नेतृत्वाचा त्याचा लाभ होईल.

कोणाच्या एकट्या कुटुंबासाठी ओबीसी समाजाचा वापर एकनाथराव खडसे कधीही करणार नाही. हे राज्याच्या जनतेला माहित आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टातून रद्द करण्यात आले. त्यासाठी राज्यात नाथाभाऊ खडसे यांनी पुढाकार घेऊन ओबीसी कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यावे हे राजकीय आरक्षण पुन्हा ओबीसींना मिळून द्यावे कारण याचा कायदेशीर पाठपुरावा हे नाथाभाऊच करू शकतात. निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तिकीट वाटपाची राज्याची ओबीसीची धुरा आगामी काळात पक्ष नेतृत्व नाथाभाऊंच्या खांद्यावर देतील यात कुठलीही शंका नाही कारण नाथाभाऊ एक लढाऊ व्यक्तिमत्व आहे. आपल्या कार्यकर्त्यासाठी ओबीसी समाजासाठी लढणारा नेता आहे.

राज्यात ओबीसी समाजात अनेक संकुचित विचारसरणीचे नेते मंडळी आहेत. पण हे मंडळी मी आणि माझे या पलीकडे कधीच गेलेच नाहीत. आपल्या परिवारा शिवाय बाहेर कुठल्या ही कार्यकर्त्याला यांनी न्याय दिलेला नाही. आपण आणि आपला परिवार म्हणजे ओबीसी समाज आहे. हेच समुजन आज पर्यंत ह्या नेत्यांनी कार्य केले आहे. एक कुटुंब किंवा एक परिवार म्हणजे संपूर्ण ओबीसी समाज नाही असे या ऑनलाईन बैठकीत राज्यातील सर्व ओबीसींचे नवीन फळीच्या कार्यकर्त्यांचे विचारातून पुढे आले.

नवीन फळीच्या ओबीसी कार्यकर्त्यांना आता समाजासाठी काम करणारा नेता हवा आहे. स्वतः साठी लढणार्‍या नेत्याच्या पाठीमागे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या आशा गमावले आहेत. राज्यातील या बुद्धिजीवी ओबीसी कार्यकर्त्यांचे ऑनलाईन बैठकीत अतिशय महत्त्वाची चर्चा करण्यात आली यावेळी सर्वांनी मिळून नाथाभाऊ खडसे यांना साकडे घातले की नाथाभाऊ यांनी ओबीसी समाजासाठी लढावे माळी, तेली,तांबोळी,धोबी,परीट, वंजारी,धनगर,भाट या समाजातील व ओबीसी समाजात येणाऱ्या सर्व जातीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यावे ही विनंती सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी केली. आगामी ओबीसी आरक्षण संदर्भातले सर्व मुद्दे शासन दरबारी व न्यायालय दरबारी मांडावे व ओबीसी हिताचे निर्णय समाजाला मिळवून द्यावे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या हातून अपूर्ण राहिलेल्या ओबीसीचे कार्य नाथाभाऊंनी पूर्ण करावे हीच खरी गोपीनाथराव मुंडे यांना खरी श्रद्धांजली असेल. नाथाभाऊ आप आगे बढो राज्यातला सर्व ओबीसी तरूण आपल्या पाठीशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका,बाजार समिती असेल, विकास सोसायटी असतील, सर्व प्रकारच्या स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांना निवडून आणावे. यांना सर्वाना पक्षाचे तिकीट मिळवून द्यावे ओबीसी समाजाची आशा फक्त आणि फक्त राज्यामध्ये आता आपल्याकडे आहे आपणच ओबीसी समाजाला न्याय देऊ शकतात.

इतर ओबीसी नेते फक्त आपल्या कुटुंबालाच न्याय देतील.आणि पुन्हा ओबीसी समाजाच्या नावावर पदरात काही तरी पाडून घेतील आणि ओबीसी समाज आहे. तसाच रोडवर राहील. यासाठी नाथाभाऊ खडसे आम्हा सर्व ओबीसी तरुणांचे आपल्याला हात जोडून विनंती आहे. की आपण ओबीसीसाठी लढा आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून काम करू कुठेही मागे हटणार नाही. ओबीसी समाजासाठी आपण फक्त आवाज द्या लाखो कार्यकर्त्यांची फौज आह्मी आपल्या पाठीशी उभी करू असे यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मते मांडली सर्वांनी एक मताने नाथाभाऊच राज्यातील आगामी ओबीसी नेतृत्व असतील असा एकमताने या ऑनलाईन बैठकीत ठराव पास केला शेवटी महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले व बैठकीची सांगता झाली.