Ratan Tata (Photo Credit - Wikimedia Commons)

Ratan Tata Dies: एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde Government) ने उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी राज्यात एक दिवशीय दुखवटा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नामांकित समूहात रूपांतरित करण्याचे श्रेय असलेल्या टाटा यांचे बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर शोक म्हणून 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकवला जाईल. गुरुवारी कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. टाटांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे लोकांसाठी श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी परिसरात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (हेही वाचा -Ratan Tata Passes Away: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त रतना टाटा यांनी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रात्री 11.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. टाटा यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रतन टाटा आता व्यक्तिशः आमच्यासोबत नसले तरी त्यांचा नम्रता, औदार्य यांचा वारसा आहे. आणि हेतू भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

रतन टाटा हे पारशी समाजातून होते, परंतु, त्यांचे अंतिम संस्कार पारशी रीतिरिवाजानुसार न करता हिंदू परंपरेनुसार केले जातील. त्यांचे पार्थिव आज दुपारी 4 वाजता मुंबईतील वरळी येथील विद्युत स्मशानभूमीत ठेवण्यात येणार आहे. येथे सुमारे 45 मिनिटे प्रार्थना होईल, त्यानंतर अंतिम संस्कार प्रक्रिया पूर्ण होईल.