चालताना चपाक चपाक आवाज आलेल्या चप्पला म्हणजे कोल्हापुरी चप्पलांची (Kolhapuri Chappal) ओळख! त्यामुळे अशा चप्पला पायात घालून मिरवणे हे देखील अनेकांसाठी स्टेटसचा विषय असतो. मात्र अनेकदा कोल्हापुरी चप्पलांच्या नावाखाली बनावट चप्पला दिल्या जातात. त्यामुळे लोक कोल्हापुरात जाऊनच चप्पला विकत घेतात. त्यामुळे जर का या लोकप्रिय चप्पला ऑनलाईन उपलब्ध झाल्या तर? ही कल्पना देखील ऐकायला किती चांगली वाटते. मात्र आता याच कोल्हापुरी चप्पला ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर (Amazon) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ही माहिती दिली आहे.
अॅमेजॉनवर याची विक्री सुरु झाली असून हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ही ऑनलाईन सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी राहणार बंद
कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध
माझ्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ..उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची उत्पादने अमेझॉन डिजीटल बाजारपेठेत
देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध pic.twitter.com/mWtVwD2Tfv
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) October 12, 2020
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची उत्पादने अमेझॉन डिजीटल बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
दरम्यान यंदा शारदीय नवरात्रोत्सवात (Shardiya Navratri) कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi Temple) भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात हे मंदिर बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मंदिर समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.