NMMT कडून आता अटल सेतू वरून धावणार्या 2 एसी बस 12 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. नेरूळ ते मंत्रालय आणि खारघर ते मंत्रालय या दोन बस आहेत. 116 ही बस नेरूळ बस स्टेशन पूर्व ते मंत्रालय अशी धावणारी बस उल्वे, शिवाजी नगर टोल गेट अशी ही बस जाणार आहे तर 117 ही बस खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय जाणार आहे. ही बस पनवेल, पळस्पे, गावण टोल गेट या मार्गावरून जाणार आहे. दरम्यान अटल सेतू वर एनएमएमटी कडून बस चालवावी यासाठी प्रवाशांकडून मोठी मागणी होत होती आता अखेर अखेर त्यांनी 2 विशेष एसी बस सेवा सुरू केली आहे.
NMMT च्या अटल सेतू वर धावणारी बस वेळ, तिकीट दर
नेरूळ ते मंत्रालय ही बस 95-100 मिनिटं घेणार आहे तर खारघर ते मंत्रालय ही बस 100-115 मिनिटं प्रवास करणार आहे. यामध्ये नेरूळ- मंत्रालय एसी बसची तिकीट 230 रूपये आहे आणि खारघर-मंत्रालय बसची तिकीट 270 रूपये आहे. नेरूळ- मंत्रालय बस सकाळी 7.55 वाजता सुटणार आहे. मंत्रालय ते नेरूळ ही बस 6.25 वाजता संध्याकाळी सुटणार आहे. तर 117 नंबरची खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय ही बस सकाळी 7.40 ला सुटणार आहे. परतीच्या प्रवासाची बस 6.15 वाजता संध्याकाळी धावणार आहे.
अटल सेतू वरून यापूर्वी बेस्ट कडून बस चालवली जात आहे. त्या बसची तिकीटं चलो अॅप वर काढता येतात. अटल सेतू हा मुंबई- नवी मुंबईला जोडणारा पूल आहे. न्हावा शेवा ते शिवडी असा हा पूल प्रवाशांचा मोठा वेळ वाचवणार आहे.