निसर्ग चक्रीवादळ रत्नागिरी । Photo Credits: Twitter

निसर्ग चक्रीवादळाने (Nisarga Cyclone) आता तीव्र रूप धारण केल्याने कोकणाच्या किनारपट्टीवर त्याचे परिणाम पहायाला मिळत आहेत. दरम्यान आज दुपारी 4 वाजेपर्यंत अलिबाग मध्ये लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच रत्नागिरीमध्ये वार्‍याचा वेग 120 किमी पर्यंत गेल्याच पहायला मिळालं आहे. आज सकाळी रत्नागिरीच्या समुद्रामध्ये उंचच उंच लाटा पहायला मिळाल्या आहेत. जोरदार वारा आणि खवळलेल्या समुद्रामध्ये डोलणारी बोट असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.

रत्नागिरीत वादळी वारा आणि जोरदार पाऊस बरसत आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास वार्‍याचा वेग 59 kmph होता. तर दक्षिण कोकण किनारपट्टीवर वार्‍याचा वेग 80 kmph पर्यंत नोंदवण्यात आला आहे. उत्तर किनारपट्टीवर 70 kmph पर्यंत वेगाने वारे वाहत आहेत. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज चक्रीवादळामध्ये कोकणासअह मुंबईत 120-125 kmph वेगाने वारा वाहेल असा अंदाज हवामन खात्याने यापूर्वीच वर्तवला आहे.  इथे पहा निसर्ग चक्रीवादळाचे लाईव्ह अपडेट्स.

रत्नागिरी मधील स्थिती

दापोली मधील स्थिती

महाराष्ट्राच्याप्रमाणेच गोव्यातही पाऊस जोरदार 

निसर्ग चक्रीवादळाची गती वाढली असून आता दापोली पर्यंत त्याचा परिणाम पहायला मिळाले आहेत. जोरदार वारा आणि पाऊस बरसत असल्याने येत्या काही तासांत ही परिस्थिती थोडी अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या किनारपट्टीजवळ राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि बचाव कार्यसाठी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. येत्या काही तासांत अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.