नववर्षाचे स्वगत करण्यासाठी नववर्षाच्या पुर्वसंध्येला (New Year's Eve Celebrations) गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे पर्टयक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. प्रामुख्याने गेट वे ऑफ इडिया आणि ताज हॉटेल सह इतरही काही ऐतिकासिक वास्तू या परिसरात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे नववर्षाच्या स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी 'गेट वे ऑफ इंडिया' येथे नागरिक दरवर्षीच मोठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. ही शक्यता टाळण्यासाठी मुंबई पोलीस दरवर्शीच बंदोबस्ताचे नियोजन चोख करत असतात. त्यामुळे यंदाही ते करण्यात आले आहे, असे वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, Pune: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त, महत्त्वाच्या रस्त्यांवर असणार नाकाबंदी)
'गेट वे ऑफ इंडिया' येथील बंदोबस्ताबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशासनाने निर्णय घेतला आहे की जेट्टी क्रमांक 1 ते जेटी क्रमांक 4 पर्यंतच्या बोटी दुपारनंतर बंद राहतील. 31 डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून सुरक्षेच्या कारणास्तव दुपारी 2.00 नंतर कोणतीही बोट सोडणार नाही.
नवी मुंबई पोलीसही सज्ज
दरम्यान, मुंबई पोलिसांनीही नववर्षानिमित्त सीमा सुरक्षेसाठी अनेक आदेश जारी केले आहेत. तत्पूर्वी, नवी मुंबई पोलिसांनीही बुधवारी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक उपाययोजना आणि मोहिमेची घोषणा केली. नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था चोख असणार आहे. सुमारे 3,000-3,500, पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर तैनात असतील. सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत करा पण ते सुरक्षितपणे करा, असे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. नागरिकांनी रस्ता सुरक्षा आणि सुरक्षेशी तडजोड न करता आनंद घ्यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले. "लोकांना मद्यपान करून वाहन चालवू नका, असा सल्ला देण्यात आला आहे, असे ते म्हणाले.