Today Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर
Representational Image | File Image | (Photo Credits: Getty Images)

तेल कंपन्यांनी शनिवारी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. ताज्या किमतीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, महाराष्ट्र राज्यात गुरुवारी शिंदे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व शहरांप्रमाणे मुंबई शहरातही वाहनांच्या इंधनाचे दर कमी करण्यात आले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर मुंबईत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे.

मुंबईत सध्या पेट्रोलचे दर 106.31 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे आजही 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत केवळ 89.62 रुपये आहे. हेही वाचा Mumbai Local Mega Block Update: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर 17 जुलैला मेगाब्लॉक; पहा कधी, कुठे?

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.