New COVID-19 Omicron Sub-Variant BA.2.75: भारतामध्ये आढळला नवा कोविड 19 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट
WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus. (Photo Credits: Getty Images)

कोरोना वायरसचा (Corona Virus) नवा ओमिक्रॉन सब व्हेरिएंट (Omicron sub-variant) BA.2.75 आढळला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश असल्याची माहिती World Health Organisation चे Director-General Tedros Adhanom Ghebreyesus यांनी दिली आहे. मागील 2 आठवड्यामध्ये जगभरात सुमारे 30% कोविड रूग्णांची वाढ झाली आहे. सहापैकी 4 जणांमध्ये सध्या मागील आठवड्यांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. युरोप, अमेरिकेमध्ये BA.4 आणि BA.5 हे व्हेरिएंट कोरोना लाटेचं कारण ठरत आहेत.

बुधवार (6 जुलै) दिवशी भारतामध्ये 16,159 कोविड रूग्ण समोर आले आहेत. दरम्यान 15,394 कोरोना रूग्णांनी या आजारावर मात देखील केली आहे. रिकव्हरी रेट 98.53 आहे. तर देशातील एकूण रूग्णसंख्या 4,29,07,327 पर्यंत पोहचली आहे. नक्की वाचा: North Korea: 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा .

कालच्या ब्रीफिंग दरम्यान, WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.75 हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. "प्रथम भारतातून आणि नंतर सुमारे 10 इतर देशांमधून अहवाल आला," असेही त्या म्हणाल्या आहेत. या सब व्हेरिएंट मध्ये अतिरिक्त रोगप्रतिकारक चोरीचे गुणधर्म आहेत की ते अधिक वैद्यकीयदृष्ट्या गंभीर आहेत हे जाणून घेणे सध्या घाईचं होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.