Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे यांची दिशा पावले कोणत्या दिशेला? इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना गती
Amol Kolhe | (Photo Credit: Instagram)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या भाजप नेत्यांसोबत मधल्या काळात वाढलेल्या भेटीगाठी राजीकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या चर्चा अलिकडील काही काळात थंडावल्या होत्या. तोवरच खासदार कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडओ पोस्ट (Instagram Post) केला आहे. या व्हिडिओवरुन आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेकांनी तर शिरुरच्या (Shirur) खासदाराच्या मनात आहे तरी काय? त्यांची पावले नेमकी कोणत्या दिशेला पडत आहेत? त्यांचा वेग किती आणि कसा आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

अमोल कोल्हे यांनी व्हिडिओत वेग आणि दिशा यावर भाष्य केले आहे. परंतू, व्हिडिओतील शेवटच्या विधानामुळे मात्र त्याला राजकीय स्वरुप प्राप्त झाले आहे. अमोल कोल्हे यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, 'जोपर्यंत गती आहे तोपर्यंत चक्रं एकाच दिशेने भासतात, पण गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत. याला निसर्गाचा नियम म्हणायचा, की सगळीकडेच असं असतं? आयुष्य, करिअर, राजकारण..! गती कमी झाल्यानंतर दिशा कळते.' व्हिडिओच्या शेवटी कोल्हे यांनी वापरलेले 'गती कमी झाल्यानंतर दिशा कळते' हे वाक्य अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. (हेही वाचा, Amol Kolhe On Indrayani Medicity Project: पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाचा फडणवीस विचार करतील, अमोल कोल्हेंचे वक्तव्य)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

अमोल कोल्हे हे पेशाने डॉक्टर मराठीतील अभिनेते आणि राजकाणी आहेत. एका खासगी वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती', 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकांतून ते घराघरात पोहोचले. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला शिवसेनेत राजकीय कारकीर्द सुरु करुन त्यांनी पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीतूनच त्यांनी लोकसभेसाठी निवडणूक लढवली आणि ते शिरुरचे खासदार बनले. मधल्या काळात ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोरदार उधान आले होते.