महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondiya) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार (NCP MP) मधुकर कुकडे (Madhukar Kukade) यांनी शाळेतील स्नेहसंमेलनात मुलांसोबत नृत्याविष्कार सादर केला. त्यांनी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग-सारा अली खान स्टारर 'सिम्बा' (Simmba) सिनेमातील 'आंखे मारे' (Aankh Marey) या गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या नृत्याचा व्हिडिओ समोर आला असून त्यात कुकडे अगदी तल्लीन होऊन डान्स करताना दिसत आहेत.
#WATCH NCP MP from Bhandara-Gondiya Madhukar Kukade dances with students during a school function in Bhandara. #Maharashtra (5.1.19) pic.twitter.com/tCJJB9igxr
— ANI (@ANI) January 7, 2019
वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित राहिलेल्या कुकडेंना मुलांसोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. हा डान्स व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रीया समोर आल्या. काहींनी खासदार कुकडेंच्या कुल अंदाजाचे कौतुक केले आहे तर काहींनी त्यांनी डान्स करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
कुकडे सध्या महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. 31 मे रोजी त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणूकीत भाजपाचे हेमंत पटेल यांना पराभूत केले होते. त्यापूर्वी त्यांनी 1995 ते 2009 या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या तुमसार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.