Nawab Malik on Devendra Fadnavis: 'तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?' नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
Nawab Malik & Devendra Fadnavis (Photo Credits: Facebook)

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्राने सगळं करायचं आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसणार. दिलेलं आरक्षणंही गमावून बसरणार असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे. "फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?" असं म्हणत भाजपाने माशा मारण्याची स्पर्धा भरवावी, असं नवाब यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये लिहिले, "फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!" (Maharashtra BJP: भाजपचे चंद्रकांत पाटील सांगतात 'औकातीत राहावं', देवेंद्र फडणवीस म्हणतात 'राज्याने काय माशा मारायच्या काय?')

Nawab Malik Tweet:

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु, महाविकास आघाडी सरकार टाईमपास करत आहे. घटनेच्या कलम 102 मध्ये सुधारणा केल्यानंतर कोणत्याही समाजाला मागास घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारकडेच राहील, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. परंतु, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात यासंदर्भात एकमत झाले नाही. केंद्राने सगळं करायचं आणि हे काय राज्यात माशा मारत बसणार आणि दिलेलं आरक्षण गमावून बसणार? असं किती दिवस चालणार? दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्त्युतर देत टोला लगावला आहे.