NCB Office (Photo Credits-ANI)

गेल्या काही काळापासून वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शुक्रवारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने मुंबईतील तीन ठिकाणी छापे (Raids) टाकले. या छाप्यांमध्ये मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) छापा टाकून एमडी ड्रग्जची मोठी खेप जप्त करण्यात आली.  मुंबई विमानतळावर एक व्यक्ती ड्रग्जची (Drugs) तस्करी करण्यासाठी येणार असल्याची टीप एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका व्यक्तीला अमली पदार्थांसह अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ड्रग्जची ही खेप ऑस्ट्रेलियाला पाठवली जात होती. ड्रग्जची ही खेप कोठून आली आणि ती कोणाच्या माध्यमातून पाठवली गेली याचा तपास सध्या एनसीबीचे पथक करत आहे. बॉलीवूड मेगास्टार शाहरुख खान (SRK) याचा मुलगा आर्यन खान याने मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये केलेल्या कारवाईमुळे समीर वानखेडेचे नाव चर्चेत आले. या कारवाईत आर्यन खानला अटक करण्यात आली. हेही वाचा Mumbai Pollution: मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले, 'हे' आहे मोठे कारण

यानंतर आर्यन खानला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावे लागले. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला होता की समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाला खंडणीसाठी लक्ष्य केले होते आणि खरा ड्रग माफिया कधीच क्रूझमध्ये पकडला गेला नाही.