Nawab Malik Arrested: मुंबईत ईडीने अंडरवर्ल्ड संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. यापूर्वी ईडीची टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांनी तब्बल आठ तास चौकशी केली. अटकेनंतर मलिक यांची जेजे रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात सादर करण्यात आले. सुनावणी दरम्यान ईडीने कोर्टाला आरोपी मलिक यांची 15 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.
नवाब मलिक यांच्या चौकशीवर महाराष्ट्र सरकारने टीका केली आहे. तसेच केंद्रावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुशरिफ, दिलीप पाटील आणि राजेश टोपे यांच्यासोबत पवार यांनी निवासस्थानी बैठक बोलावली होती.(Nawab Malik यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांचा शरद पवारांना फोन; दर्शवला पाठींबा)
Tweet:
#WATCH | NCP workers gather outside the Enforcement Directorate office in Mumbai and raise slogans after the arrest of party leader and Maharashtra minister Nawab Malik. He has been arrested in connection with Dawood Ibrahim money laundering case. pic.twitter.com/cY6FDytpZq
— ANI (@ANI) February 23, 2022
मलिक यांच्या अटकेनंतर शिवसेना नेते संजय राउत, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा विधाने केली आहेत. तर नवाब मलिक यांनी ट्विटरवर असे लिहिले की, घाबरणार नाही, झुकणार नाही. सर्वांना एक्सपोज करणार.(Atul Bhatkhalkar On Nawab Malik: नवाब मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली, कारवाई योग्य दिशेने सुरू - अतुल भातखळकर)
Tweet:
ना डरेंगे ना झुकेंगे!
सत्य जिंकेलच..!!@nawabmalikncp#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/ioFbw8xiNO
— Babajani Durrani (@babajanidurrani) February 23, 2022
दरम्यान, ईडीकडून दाऊद इब्राहिम संबंधित त्याचा भाऊ अनीस, इकबाल, साथीदार छोटा शकील यांच्या विरोधात तपास करत आहे. यासाठी गेल्या आठवड्यात काही ठिकाणी छापेमारी सुद्धा करण्यात आली. त्यामध्ये दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्या घरी सुद्धा ईडी अधिकारी पोहचले होते. तसेच हसीनाचा मुलगा अलिशाह पारकर याची सोमवारी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. दाऊदच्या अन्य साथीदारांवर ईडी नजर ठेवून आहे. कारण असा दावा करण्यात येत आहे की, दाऊद काही लोकांची मदत घेत मुंबईत अद्याप ही डी-कंपनी ऑपरेट करत आहे.