Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

Navi Mumbai News: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या बेलापूर कार्यालयाने 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या बिगरपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराविरुद्ध परीक्षा केंद्रावर स्पाय कॅमेरा वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. स्पाय कॅमेऱ्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एमपीएससीच्या वरिष्ठ अधिकारी सुप्रिया लकडे यांच्या तक्रारीच्या आधारे, बेलापूर पोलिसांनी विद्यार्थ्यासह तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परीक्षा कायदा, 1982 मधील गैरव्यवहार प्रतिबंधक कलमांखाली  आणि आयटी कायदा गुन्हा दाखल केला.

फिर्यादीनुसार, आकाश भाऊसिंग घुनावत (२७) असे जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो ३० एप्रिल रोजी पुण्यातील जेएसपीएम जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या परीक्षेला बसला होता.परीक्षा हॉलच्या बाहेर प्रश्नपत्रिका पाठवण्यासाठी स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला आणि त्याच्या मोबाइलवर उत्तरे मिळवली, त्यामुळे अनुचित मार्गाने परीक्षा उत्तीर्ण झाली.

 

मुंबई पोलिसांनी आरोपींपैकी शंकर चैनसिंग जारवाल (३०, रा. जालना) याला अटक केली होती. तपासात पोलिसांना आढळून आले की, आरोपींनी अनेक इच्छुकांना स्पाई कॅमेरा वापरून स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत केली होती, दूरच्या ठिकाणाहून उत्तरे दिली होती. घुनावतने एप्रिल 2023 मध्ये झालेल्या एमपीसीबी परीक्षेतही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पोलिसांना आढळले.

मुंबई पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, परीक्षेला बसलेले उमेदवार जीवन नैमाने या व्यक्तीला स्पाय कॅमेरा वापरून प्रश्नपत्रिका पाठवत असत. नंतर प्रश्नपत्रिका जारवाल यांनी सोडवून उमेदवाराच्या मोबाईल क्रमांकावर पाठवली.