गणेशोत्सवाचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मुंबई, पुण्याकडून कोकणात जाण्यासाठीची धावधाव सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमनी कोकणात जात असल्याने या काळात खाजगी ट्रॅव्हल्स चालक किंमती वाढतात. पण प्रवाशांची लूट रोखण्यासाठी आता नवी मुंबई आरटीओने दर पत्रक जारी केले आहे. यामध्ये जादा भाडं आकारल्यास प्रवासी तक्रार देखील करू शकणार आहेत. निश्चित दरापेक्षाही जादा भाडे घेतल्यास कारवाई करण्यात येणार असून आरटीओकडून कालपासून खासगी बस चालकांची तपासणी देखील सुरू केली आहे, अशी माहिती आरटीओने दिली आहे.
कोकणात जाण्यासाठी रेल्वे हा किफायतशीर आणि आरामदायी पर्याय आहे परंतू तीन-चार महिने आधीच कोकणात जाणार्या गाड्यांचे तिकीट फुल्ल झालं असल्याने रस्ते प्रवास करावा लागतो. परंतू प्रवाशांचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा तिकीट आकारलं जात असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट देखील होते. त्यामुळे आता हीच लूट रोखण्यासाठी परिवहन कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांसाठी दर निश्चित केले आहे. Toll Rates Increase From October: 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या 5 Entry Points वरील टोल दर 12.5 ते 18.75 टक्क्यांनी वाढणार .
काय आहेत नवी मुंबई आरटीओ चे दर?
वाशी ते महाड – ४२८
वाशी ते खेड – ५७८
वाशी ते चिपळूण – ६२३
वाशी ते दापोली – ५३३
वाशी ते श्रीवर्धन – ४२८
वाशी ते संगमेश्वर – ७२८
वाशी ते लांजा – ८९३
वाशी ते राजापूर – ९५३
वाशी ते रत्नागिरी – ८४८
वाशी ते देवगड – ११८५
वाशी ते गणपतीपुळे – ९७५
वाशी ते कणकवली – १११०
वाशी ते कुडाळ – ११८५
वाशी ते सावंतवाडी – १२६०
वाशी ते मालवण – १२१५
वाशी ते जयगड – ९५३
वाशी ते विजयदुर्ग – १२००
वाशी ते मलकापूर – ९०८
वाशी ते पाचल – ९९०
वाशी ते गगनबावडा – १११०
वाशी ते साखरपा – ८१८
नवी मुंबई आरटीओ विभागा कडून वाशी पासून कोकणात जाणाऱ्या 21 मार्गावरील बस थांब्यासाठी दर निश्चित केले आहेत. प्रवासभाडे निश्चित केलेल्या 21 मार्गांमध्ये महाड, खेड, चिपळूण , रत्नागिरी, कुडाळ , राजापूर, देवगड, लांजा , सावंतवाडी, मालवण, कणकवली, गणपतीपुळे, गगनबावडा यांचा समावेश आहे. तसेच बस थांब्यावर देखील दर पत्रके लावून त्याचे पालन करण्याच्याही सूचना केल्या आहेत. यादरम्यान खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे.