नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये सायबर फ्रॉड्स (Cyber Frauds) मधून दिवसाला 1 कोटींची लूट होत असताना आता यावर नागरिकांना मदतीचा हात म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) व्हॉट्सअॅप चॅनेल (WhatsApp Channel) आणि हेल्पलाईन नंबर (helpline number) लॉन्च केला आहे. याद्वारा नागरिकांमध्ये ऑनलाईन स्कॅम (Online Scam) बाबत सजगता निर्माण केली जाणार आहे.
वाशीच्या CIDCO exhibition centreमध्ये डिरेक्टर जनरल ऑफ पोलिस रश्मी शुक्ला यांनी या मोहिमेला लॉन्च केले आहे. नवी मुंबई पोलिस कमिशनर मिलिंद भारंबे देखील उपस्थित होते. सायबर फ्रॉडच्या तुलनेत घरात लूट, चोरीची प्रकरणं नवी मुंबई मध्ये अधिक आहेत.
1100 प्रकरणं ही यंदाच्या वर्षी लूटमार, चोरी यांची होती. यामध्ये आर्थिक नुकसान 13.67 कोटीचे आहे. या तुलनेमध्ये सायबर फ्रॉड 249 प्रकरणं आहेत. पण त्यामध्ये लूट झालेली रक्कम 168 करोड म्हणजे दिवसाला 1 कोटी आहे असे भारांबे म्हणाले आहेत. ठाण्यातील रहिवाश्याला ऑनलाईन पद्धतीने रिचार्ज करणे पडले महागात, गमावले तब्बल 80 हजार रुपये.
सायबर फ्रॉड मध्ये लूटली गेलेली रक्कम मोठी असल्याने आता त्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचे आहे. याला कमी करण्याचा एक पर्याय म्हणजे लोकांमध्ये त्याची जागृती करणं. चर्चा सत्र आणि सेमिनार मधून याबद्दल जागृती वाढवली जाईल. मोठ्या प्रमाणात लोकांपर्य्त पोहचण्यासाठी WhatsApp channel मदत करणार आहेत.
‘Navi Mumbai Police’असं व्हॉट्सअॅप चॅनेलचं नाव आहे. तर हेल्पलाईन नंबर
8828112112 आहे. ऑनलाईन स्कॅम आणि सायबर फ्रॉड्स रोखायला आवश्यक मदत यावर मिळू शकणार आहे.