Nashik News : गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, नाशिक येथील घटना
Dead-pixabay

Nashik Crime News : मैत्री म्हटलं की थट्टा, मस्करी असेत. मात्र, चेष्टा, मस्करीची मर्यादा ओलांडली की एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो, अशी घटना नाशिक शहरात (Nashik News) घडली आहे. थट्टा मस्करी दरम्यान गुप्तांगावर मारल्याने 15 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू (15 year boy died )झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात  (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.7 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास फिल्टरेशन प्लांटजवळ हा घटना घडली. ( हेही वाचा:Nagpur Crime: फळविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या; नागपूरमधील खळबळजनक घटना )

 

मोबाईल खेळत असताना सोन्या, मोहीत, सुमित व लवनित हे चौघे जण जात होते. त्यावेळी सुमित आणि लवनित यांच्यामध्ये काही तरी कारणावरुन चेष्टा मस्करी सुरू झाली. त्यात लवनितने सुमितला डोक्यात मारले. त्यानंतर सुमितने लवनितच्या पोटात दोन बुक्के मारुन त्याला जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर सुमितने लवनितच्या गुप्त भागावर हाताचा कोपरा मारला. त्यात लवनित भगवाने (15, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) हा जागीच बेशुद्ध झाला. ( हेही वाचा: Buldhana Crime News: जिल्हा परिषदेतील शाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार,आरोपी अटकेत )

हे पाहून मोहीत आणि सुमितने त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र उपचार सुरू असताना लवनितचा मृत्यू झाला. ही घटना समजताच प्रशांत झिनवाल यांनी ही माहिती त्याची मोठी आई संगिता झिनवाल यांना सांगितली. त्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित सुमित विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.