नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात वणी सापुतारा मार्गावरील (Vani Saputara Highway) खोरीफाट्यावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले आहे. या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वणी-सापुतारा महामार्गावर खोरीफाट्याजवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - )
हे सियाज कार नं.एम एच 41 व्ही 7787 ने सापुताऱ्याकडुन वणीच्या दिशेने येत असतांना समोरुन येणारी क्रुजर गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली यात विनायक क्षिरसागर, योगेश वाघ यांचा जागीच तर जतिन पावडे व रविंद्र चव्हाण यांचा नाशिक येथे जिल्हा रुग्णालयैत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
तर क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे, वय 40, कल्पना सुभाष सोळसे, वय 19, तुळशीराम गोविंदा भोये वय 28, ललीता युवराज कडाळे वय 30, रोहिदास पांडुरंग कडाळे, वय 25, योगेश मधुकर सोळसे वय 15, सुभाष काशिनाथ सोळसे वय 15, देवेंद्र सुभाष सोळसे, वय 47, नेहल सुभाष सोळसे वय 7 हे सर्व रा. केळवण, ता. सुरगाणा गंभीर जखमी झाले असून वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.