Cordelia Cruise (Photo Credits: Facebook)

काल (शनिवार, 2 ऑक्टोबर) मुंबईत (Mumbai) क्रुझवर (Cruise) आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह (Rave Party) पार्टीवर एनसीबी (NCB) कडून छापा टाकण्यात आला. यात 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) रेव्ह पार्टी सुरु होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये बॉलिवूडमधील मोठ्या कलाकाराच्या मुलाचा समावेश असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या छापेमारीत अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोकेन, चरस आणि एमडी सारखे ड्रग्स मोठ्या प्रमाणावर जप्त केले आहेत.

याबद्दल माहिती देताना एनसीबी मुंबईचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (MCB Mumbai Zonal Director Sameer Wankhede) यांनी सांगितले की, "आम्ही काही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. सध्या आम्ही 8-10 जणांची चौकशी करत आहोत." या पार्टीत कोणी सेलिब्रिटी उपस्थित होता का? असे विचारले असता, "त्यावर मी भाष्य करु शकत नाही," असे उत्तर वानखेडे यांनी दिले आहे. (Mumbai Drugs Case: मुंबई मध्ये मागील वर्षभरात 300 कोटींचे ड्र्ग्स जप्त तर 300 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्स अटकेत; NCB ची माहिती)

ANI Tweet:

प्राप्त माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी म्हणून चढले होते. त्यात हायप्रोफाईल ड्रग पार्टी सुरू झाल्यानंतर एनसीबीने छापा टाकला. एनसीबीची ही कारवाई सुमारे 7 तास चालली. कारवाईनंतर क्रूझ मुंबईला परत आणण्यात आली. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येईल. तसंच सर्वांची डोप टेस्टही होण्याचीही शक्यता आहे.