नारायण राणे (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक नेत्यांपैकी एक नारायण राणे (Narayan Rane) लवकरच आपलं आत्मचरित्र लिहणार आहेत अशी माहिती आज त्यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच हे आत्मचरित्र (Autobiography) नारायण राणे यांच्या शब्दांत असेल. 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा' असं ट्विटमध्ये लिहलं असल्याने त्यांच्या आत्मचरित्राबद्दल उत्सुकता वाढली आहे. आनंद दिघे यांना कोणी मारलं? सोनू निगमच्या हत्येचा कट कोणी रचला? निलेश राणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप

नितेश राणे ट्विट

नारायण यांच्या आयुष्यात अनेक चढ - उतार आले. एकेकाळी शिवसेना पक्षाकडून नारायण राणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेसोबत मतभेद झाल्याने ते बाहेर पडले. पुढे कॉंग्रेसपक्षात त्यांनी प्रवेश केला. तेथेही त्यांनी मंत्रीपदं भूषवली आहेत. पण कॉंग्रेसमध्येही त्यांचे मतभेद झाल्याने तेथून बाहेर पडत आता ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली.

भाजपाच्या मदतीने नारायण राणे आता राज्यसभेवर खासदार आहेत. मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीमधील काही गोष्टींचा उलगडा होणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.