
Nana Patole On Brokers In Nirmal Building: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pendrive Bomb) फोडण्याची धमकी दिली आहे. कोणते कंत्राट कोणाला द्यायचे हे ठरवणारे निर्मल बिल्डिंग (Nirmal Building) मधील दलाल उघड करू. हिवाळी अधिवेशनात याचा पर्दाफाश केला जाईल, असंही पटोले यांनी म्हटलं आहे. परिणामी, राज्याच्या गृहमंत्रालयाने इमारतीत येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम जारी केले आहेत.
नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, एकीकडे मंत्रालयात प्रवेशावर निर्बंध आहेत, तर दुसरीकडे दलालांचा मुक्त संचार आहे. धक्कादायक म्हणजे, सरकारचा सर्वात मोठा दलाल मंत्रालयाजवळील निर्मल बिल्डिंगमध्ये बसतो. या दलालाचे रेकॉर्डिंग पक्षाकडे आहे, असंही पटोले यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -NCP Mumbai President: अजित पवार यांची रणनीती; समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती)
दरम्यान, यापूर्वी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे