Coronavirus Update: चिंताजनक! नागपूर, नाशिक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ, पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसागणिक राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. राज्यात काल (17 मार्च) 23,179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9138 कोरोना रुग्ण बरे (COVID-19 Recovered Cases) होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 23 लाख 70 हजार 507 वर (COVID-19 Cases) पोहोचली आहे. ही मागील महिन्याभरातील सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. यात नागपूर आणि नाशिकमध्येही काल सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही स्थिती चिंताजनक असून हे राज्यात पुर्णत: लॉकडाऊन च्या दिशेने पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर शहरात काल 3770 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,82,021 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 3613 वर पोहोचला आहे.हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत आज 2377 नवे कोरोना रुग्ण; 8 जणांना मृत्यू

तर दुसरीकडे नाशिकमध्ये काल सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. काल दिवसभरात 2,146 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,41,946 वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये देखील 32,359 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही राज्यातील सर्वाधिक संख्या आहे.

महाराष्ट्रात सद्य घडीला 6,71,620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे होम क्वारंटाईन असून 6,738 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सद्य घडीला 1,52,760 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 2377 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 8 जणांना मृत्यू झाला आहे. तर 876 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.