Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

अस्मानी संकटाने हवालदील झालेल्या शेतकऱ्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असताना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यात अवैध सावकारीला ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भिवापूर (Bhiwapur) तालुक्यात अवैध सावकार महिलेकडून शेतकऱ्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. एवढेच नव्हेतर, सर्वांसमोर पीडिताची साडी ओढून बेअब्रू करण्याचाही प्रयत्न झाला आहे. लज्जास्पद बाब म्हणजे, शेतकरी महिलेची बेअब्रू होत असताना सावकार आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सावकार दाम्पत्याला अटक करा, अशा मागणीनेही अधिक जोर धरला आहे.

पीडित महिलेची वाकेश्वस परिसरात एक हेक्टर शेती आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. यामुळे त्यांनी गावातील एका अवैध सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम आणि व्याज हे सावकाराला दिले होते. परंतु, सावकार 20 जून रोजी विक्रीपत्र घेऊन शेतीचा ताबा घेण्यासाठी पोहोचला. हे पाहून शेतकरी दाम्पत्याला मोठा धक्का बसला. दरम्यान, शेतकरी आणि त्याच्या पत्नीने सावकराला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर सावकराच्या पत्नीने पीडित महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच पीडित महिलेचीही साडी ओढण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपली अब्रू वाचवत शेतकरी महिला शेतातून निघून गेली. लज्जास्पद बाब म्हणजे, शेतकरी महिलेची बेअब्रू होत असताना सावकार आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत होता. या घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा पेटून उठला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! ठाणे येथे एका 18 वर्षीय तरूणाला बेदम मारहाण; दोन जणांना अटक

या घटनेवर भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात अवैध सावकाराकडून एका शेतकरी पत्नीसोबत घडलेला अतिशय गंभीर आहे. या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करून कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.