धक्कादायक! ठाणे येथे एका 18 वर्षीय तरूणाला बेदम मारहाण; दोन जणांना अटक
एका टोळीकडून 18 वर्षीय तरूणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना (Thane) ठाणे परिसरात शनिवारी घडली होती. ही संपूर्ण घटना कैमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरला झाला होता. ज्यात पाच ते सहा जण एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यांनतर स्थानिक पोलिसांनी या टोळीतील 2 जणांना मंगळवारी अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा लवकर अटक करू, असे आश्वासनही दिले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
सोशल मीडियावर 20 जून रोजी एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरला झाला होता. या व्हिडिओत पाच ते सहा जण एका 18 वर्षीय तरुणाला मारहाण केली. तसेच त्याचे कपडे देखील फाडलेले दिसले आहे. सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) प्रकाश निलेवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार, याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आम्ही लवकरच इतर आरोपींनाही अटक करू, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- चिंताजनक! पुण्यात आत्महत्येचे सत्र सुरुच; कोरोनाच्या भीतीने एका रिक्षाचालकाने कॅनॉलमध्ये उडी मारून संपवले स्वत:चे जीवन
या घटनेमागचे नमके कारण काय आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता. हा व्हिडिओला अनेकांनी संतापजनक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2020 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

