राज्यभरात गणेशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहचला आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगभग जरी सुरु झाली असली तरीही देशभरात या दिवसात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादामधून घातपात करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान संतापला आहे. तसेच काही समाजकंटकांकडून यावेळी घातपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु गणेशोत्सव काळात सर्वत्र गर्दी आणि आनंदाचे वातावरण दिसून येते. याच संधीचा फायदा घेत दहशतवाद्यांच्या माध्यमातून प्रसादाच्या माध्यमातून घातपात करु शकतात.(Ganesh Chaturthi Flower Decoration Ideas: यंदा गणपतीची आरास आकर्कष फुलांच्या मदतीने करण्यासाठी खास डेकोरेशन आयडियाज)
त्यामुळे प्रसाद खाताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सुद्धा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सुद्धा सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना याबाबत नोटीस सुद्धा देण्यात आली आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा सण अकरा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे विविध ठिकाणहून प्रसिद्ध गणपती पाहण्यासाठी सुद्धा लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात. परंतु कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.