मुंबई सह महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आता सरकारच्या आवाहनाला समाजातील विविध स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुंबईमध्ये नोकरदार व्यक्तींना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिल्यानंतर आता त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणार्या मुंबईच्या डब्बेवाल्यांनी देखील 20 मार्च ते 31 मार्च दरम्यान डब्ब्याची सुविधा बंद ठेवत असल्याचं म्हटलं आहे. कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात मुंबई डब्बेवाला असोसिएशन कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 130 वर्षात पहिल्यांदा मुंबई डब्बेवाले 10 दिवस ही सेवा बंद ठेवणार आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 49; 2 जण मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात व्हेंटिलेटर वर.
दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची खास संवाद साधताना आपलं विषाणू विरूद्ध युद्ध सुरू झालं आहे. हे युद्ध जिद्दीनेच जिंकता येऊ शकतं. त्यामुळे सरकारी यंत्रणांना मदत करा. विनाकारण त्यांच्यावरील ताण वाढवू नका. अनावश्यक प्रवास टाळा. रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूकीचा प्रवास शक्यतो टाळा. असे आवाहन करताना ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम हा पर्याय स्वीकारा. म्हणजे शहरात अनावश्यक गर्दी टाळण्यास मदत होईल. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra: Mumbai's 'Dabbawalas' to suspend their services from 20th March till 31st March, in wake of #CoronavirusPandemic; Visuals from today morning. pic.twitter.com/EoJN5Ek3Fc
— ANI (@ANI) March 19, 2020
Vaishno Devi Yatra 2020: कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर वैष्णो देवी यात्रा आजपासून बंद : Watch Video
सध्या कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा भारत देशामध्ये 169 तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक 48 इतका आहे. त्यामुळे आता काळजी घेण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आज रात्री 8 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.