Rajesh Tope | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 जणांवर पोहचला आहे. दरम्यान आज अहमदनगरमध्ये दुबई मधून प्रवास केलेल्या पुरूषाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर युके तून परतलेली एक  तरूणी कोरोना बाधित आहे. दरम्यान राज्यातील COVID 19 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी मुंबईमध्ये 2 जण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. अन्य रूग्णांची स्थिती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना 40 जण हे परदेशातून आलेले नागरिक असून अन्य 9 जणांना संसर्गातून कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर क्वारंटाईन असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल असे राजेश टोपे म्हणाले आहेत. Coronavirus: कोरोना व्हायरस हे World War; आपल्यावर आलेले विदेशी संकट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

भारत देश तसेच महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या फेझ 2 मध्ये आहेत आणि आपण तिसर्‍या टप्प्यात न जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे असेही ते म्हणाले. तसेच आयटी कर्मचार्‍यांना सक्तीचे वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. संबंधित कंपन्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल. तर देशात परदेशी नागरिकांमधून संसर्ग कमी करण्यासाठी संबंधित मंत्रालयाशी बोलणी करण्यात आली आहे. लॅब वाढवण्यासोबत खाजगी हॉस्पिटलकडे मागणी केली जाणार आहे.

महाराष्ट्रात मागील 12 तासामध्ये 7 रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊलं उचलली जाणार आहेत. तर लोकल बंद करण्याचा निर्णय हा शेवटचा उपाय असेल. तर मुंबई-पुणे बस पूर्णपणे बंद केल्या जाणार नाहीत. मात्र 50% प्रवाशांसह चालवल्या जाणार आहेत. राजेश टोपे यांनी देखील अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे.