Passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai (Photo Credit: PTI)

मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)चं टर्मिनल 1 (T1) आजपासून सुरू करण्यात आलं आहे. Adani Group च्या मालकीचं मुंबई एअरपोर्ट 20 ऑक्टोबर पासून विलेपार्ले येथील टी 1 सुरू करत असल्याचं काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं होतं पण विमानतळावरील गर्दी पाहता आता काही दिवस आधीच ते सुरू करण्यात आलं आहे. देशांतर्गत विमानप्रवासासाठी आता विलेपार्ले येथिल टी 1 टर्मिनल सुरू असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

भारतात सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने मागील काही दिवसांत विमानप्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. 8 ऑक्टोबर दिवशी टी 2 वर तोबा गर्दी झाल्याने काही लोकांची फ्लाईट्स सुटल्याचंदेखील समोर आलं आहे. त्याचे फोटो, व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाले होते. सध्या एअरलाईन्स कडून गैरसोय टाळण्यासाठी, वेळेत सिक्युरिटी चेक पूर्ण करण्यासाठी शक्य तितक्या लवकर पोहचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai International Airport वर सकाळी प्रवाशांच्या अनपेक्षित गर्दीने काही काळ गोंधळाची परिस्थिती, काहींच्या सुटल्या फ्लाईट्स; पहा फोटो, Videos.

CSMIA ट्वीट  

एअरपोर्ट ऑपरेटर्स कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजपासून T1 सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये GoFirst च्या फ्लाईट्स उड्डाण करणार आहेत. त्यानंतर 16 ऑक्टोबर पासून AirAsia India च्या फ्लाईट्स देखील उड्डाणासाठी सज्ज असतील. दरम्यान 4 ऑक्टोबरला देण्यात आलेल्या माहितीमध्ये GoFirst, AirAsia India, Star Air आणि TruJet च्या फ्लाईट्स 20 ऑक्टोबरच्या रात्रीपासून उडणार असल्याचं सांगण्यात आले होते तर 31 ऑक्टोबर पासून IndiGo देखील उड्डाण करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई एअरपोर्ट अथॉरिटी कडून एप्रिल 2021 च्या मध्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना T1 वरील फ्लाईट्स थांबवण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर सारी विमानसेवा केवळ T2 वरून सुरू ठेवण्यात आली. आता लोकांचे कोविड 19 व्हॅक्सिनेशन पूर्ण होत आहे त्यामुळे सुरक्षित वातावरणामध्ये लोकांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच  Ministry of Civil Aviation ने 18 ऑक्टोबरपासून 100 टक्के क्षमतेसह  देशांतर्गत हवाई सेवा पूर्ववत करण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे.