मुंबई महानगरपालिकेने (BMC) 17 मे ते 21 मे दरम्यानच्या कालावधीमध्ये शहरात किमान 10% पाणीकपात (Water Cut) करणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान ही पाणी कपात Pise Dam वरील pneumatic valves च्या दुरूस्तीच्या कामासाठी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे. हे काम तातडीने पालिकेने हाती घेतलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबई शहरामध्ये (Mumbai) पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
दरम्यान पालिकेने मुंबईकरांना केलेल्या आवाहनामध्ये या पाणी कपातीच्या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पालिकेला या काळात सहकार्य करावं असे देखील सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
Emergency repair work of pneumatic valves on Pise Dam supplying water to Brihanmumbai Municipal Corporation (BMC) will be undertaken, due to which, 10% water will be cut in Mumbai's water supply from May 17 to 21: Greater Mumbai Municipal Corporation#Maharashtra
— ANI (@ANI) May 11, 2021
मुंबई मध्ये फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे दुरूस्तीच्या कामासाठी मध्य मुंबई मध्ये 2 दिवस पाणी कपात करण्यात आली होती. सायन, दादर, परेल, लालबाग, माटुंगा या भागातमध्ये पाणीकपात करण्यात आली होती. त्यावेळेस Rawli reservoir च्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं.
मागीलवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मुंबई मध्ये यंदा उन्हाळ्यात अजून पाणी टंचाई किंवा पाणी कपात करण्यात आलेली नाही. पण येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने दुरूस्तीची कामं मात्र हाती घेतली आहेत.