Mumbai Weather Forecast for Tomorrow:  मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज
Rains | | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Mumbai Weather Prediction, June 22: मुंबईत आज 21 जून 2024 रोजी तापमान 29.81 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.99 °C आणि 30.72 °C दर्शवतो. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी आहे.  मुंबईत  काही ठिकाणी सकाळपासून रिम-झिम पावसाच्या सरी पडत आहेत.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, शुक्रवारी म्हणजे आज (21 जून)ला  मुंबईत ढगाळ आकाश व मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, पुढील २४ तासांत "शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असले असे सांगितले आहेत. व मुंबईत आजही यल्लो अलर्ट जारी आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बुधवारी सकाळपासून पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसरपर्यंतच्या भागात मुसळधार पाऊस पडला. गुरुवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत अनेक भागात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.आता नेमके उद्या मुंबईत हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान खात्याने मुंबई चे उद्याचे हवामान ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा:Ratnagiri Weather Forecast For Tomorrow: रत्नागिरी मध्ये उद्याचे हवामान कसे असेल? Meteorology Department कडून यलो अलर्ट जारी

मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल?

 

महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडतोय तर काही ठिकाणी नाही. यामुळे जिथे पावसाने अद्याप ही हजेरी लावली नाही आहे तिथे बळीराजा मात्र थोडा चिंतित आहे की वेळेवर पाऊस पडेल का व  पेरणीची  कामे सुरू होतील की नाही. यंदा मुंबईत पाऊस लवकर दाखल झाला परंतु त्याची तीव्रता कमी झाली होती. येणाऱ्या आवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. वर्षभरात सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज दर्शवला आहे.