
BMC कडून घाटकोपर (Ghatkopar) आणि कुर्ला (Kurla) परिसरामध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाईपलाईनच्या कामासाठी हा पाणीपुरवठा विस्कळीत राहील असं सांगण्यात आलं आहे.26 एप्रिलला सकाळी 10 वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. 27 एप्रिल ला सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी या 24 तासांसाठी आवश्यक पाणी भरून ठेवावे असे आवाहन पालिकेकेडून करण्यात आले आहे.
BMC कडून घाटकोपर पश्चिम भागामध्ये देखभालीचं काम यंदाच्या शनिवारी हाती घेतलं जाणार आहे. या कामामध्ये संत तुकाराम पुलाजवळील 1500 मिमी मुख्य पाण्याच्या पाईपलाईनवर 1200 मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बसवणे, घाटकोपर High-Level Reservoir,च्या इनलेटवर 1400 मिमी व्हॉल्व्ह बसवणे, तसेच चार क्रॉस कनेक्शन (1200 मिमी x 600 मिमी, 1500 मिमी x 600मिमी, 1500 मिमी x 300 मिमी [दोन]) आणि1500 मिमी आणि 900 मिमी व्यासाच्या दोन प्रमुख पाइपलाइनवरील गळती दुरुस्तीचा समावेश आहे.
घाटकोपरच्या कोणत्या भागात पाणी बंद राहणार?
घाटकोपर (पश्चिम) भाग: भटवाडी, बर्वे नगर, MCGM क्वार्टर्स - ए ते के ब्लॉक्स, काजुटेकडी, रामजी नगर, राम जोशी मार्ग, आझाद नगर, अकबरलाला कंपाऊंड, पारशीवाडी, सोनिया गांधी नगर, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल गांधी नगर, वर्जा नगर, वर्जा नगर, काजुटेकडी.
कुर्ला मध्ये कोणत्या भागात पाणी बंद राहणार?
कुर्ला च्या एल वॉर्ड मध्ये असल्फा गाव, N.S.S. रोड, होमगार्ड कॉलनी, नारायण नगर, साने गुरुजी उद्यान केंद्र, हिल क्र. 3, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजय नगर, समता नगर, गैबन शाह बाबा दर्गा रोड
संघर्ष नगर, खैरानी रोड, यादव नगर, जे.एम. रोड, लक्ष्मीनारायण मंदिर रोड, कुलकर्णी वाडी, मोहिली पाण्याची पाइपलाइन, भानुशाली वाडी, परेरा वाडी. मध्ये 27 एप्रिलला पाणी नाही.