mumbai university (pic credit - mumbai university twitter)

MU UG Admissions 2021 First Merit List : कोरोना संकटामुळे यंदाच्या वर्षी देखील शैक्षणिक अभ्यासाक्रमाचे आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेचे वेळापत्रक गडबडले आहे. दरम्यान शिक्षण मंडळांकडून 12वीचे निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत. आज (17 ऑगस्ट) मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी पहिली मेरीट लिस्ट(MU UG Admissions 2021 First Merit List ) प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थी ही यादी विविध कॉलेजच्या वेबसाईट वर किंवा मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर पाहू शकणार आहेत. मुंबई विद्यापीठ आज mu.ac.in वर यादी प्रसिद्ध करणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईट वर पहिली यादी कशी पहाल?

  • mu.ac.in या मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्तळाला भेट द्या.
  • होमपेजवर Mumbai University admission 2021 link वर क्लिक करा.
  • लॉगिन डिटेल्स टाकून सबमीट वर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीन वर पहिली यादी बाबतचे अपडेट्स दिसतील.

यंदा विद्यार्थ्यांना 14 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. दरम्यान आजच्या यादीमध्ये ज्यांची नावं प्रसिद्ध केली जातील त्यांच्यासाठी 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन फी, पेमेंट आणि इतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मुदत दिली जाणार आहे. (नक्की वाचा: FYJC 2021-22 Admissions Schedule: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचं वेळापत्रक जारी; अधिकमाहितीसाठी 11thadmission.org.in ला द्या भेट).

दरम्यान दुसरी मेरीट लिस्ट 25 ऑगस्ट तर तिसरी मेरीट लिस्ट 30 ऑगस्ट दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसर्‍या यादीनंतर 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू राहील. तर तिसर्‍या यादी नंतर 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. यंदा महाराष्ट्र बोर्ड प्रमाणेच अन्य बोर्डांनीही अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल लावला असल्याने उत्तीर्ण होणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे तसेच गुणांची उधळण झाल्याने टॉप कॉलेजमध्ये प्रवेशासाठी देखील चुरस पहायला मिळेल.

जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या किंवा इतर कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला तर तो/ती सुधारण्यासाठी जवळच्या मुंबई विद्यापीठ महाविद्यालयाला भेट देऊ शकते.  Mum.digitaluniversity.ac या वेबसाइटवर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरही विद्यार्थी संपर्क साधू शकतात.