Mumbai University | (Photo Credits: mu.ac.in)

मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक (Mumbai University Senate Elections) रातोरात स्थगित करण्यात आली आहे. आज 18 ऑगस्ट हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. पण अचानक बीएमसी ने परिपत्रक जारी करत काल रात्री निवडणूक स्थगित केल्याचं सांगितलं आहे. आता या निवडणूका पुन्हा कधी होणार? याची माहिती देखील देण्यात आलेली नाही. दरम्यान या निवडणूकीमध्ये अमित ठाकरे (Amit Thackeray) विरूद्ध आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) असा युवाशक्तीचा सामना होणार आहे. त्यामुळे मुंबईत या निवडणूकीची विशेष उत्सुकता होती.

मुंबई विद्यापीठामध्ये 10 सिनेट सदस्य आहेत. 9 ऑगस्टला त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 10 सप्टेंबरला मतदान आणि नंतर निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे तरूण मतदार मतदानासाठी तयारी करत होता. पण अचानक निवडणूक रद्द झाल्याने तर्क वितर्क लढवले जात आहेत.

महाराष्ट्रामध्ये मागील वर्ष-दीड वर्षात अनेक राजकीय गणितं घडली बिघडली आहेत. त्यामुळे शिवसेनेतील फूटी नंतर आदित्य ठाकरे पुन्हा त्यांच्या जोरावर मागील निवडणूकीप्रमाणे दहाही जागा जिंकणार की अमित ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी 10 जागा जिंकत राज ठाकरेंना भेट देण्याचा मानस सत्यात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वरूण सरदेसाई ट्वीट

संदीप देशपांडे ट्वीट

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आली आहे. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत नवी सिनेट अस्तित्वात येणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाचा कारभार प्रभारींवर सुरू असल्याने निवडणूक लांबली आहे. अनेकांनी अचानक निवडणूक रद्द होण्यावर नाराजी बोलून दाखवली आहे.