मुंबई मध्ये ब्रिटीशकालीन अजून एका पुलाचं पाडकाम हाती घेण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल भागातील बेलारिस ब्रीज (Bellasis Bridge) हा पुढील 18 महिन्यांसाठी बंद करण्यात येत आहे. आज 24 जून 2024 पासून हा पूल बंद करण्यात येणार आहे. आधी या पूलाचं पाडकाम केले जाणार आहे आणि नंतर तो पुन्हा नव्याने उभारला जाईल. यामुळे दक्षिण मुंबई भागातील वाहतूक प्रभावित होणार आहे. ब्रिटीशकालीन या जुन्या पुलासाठी पश्चिम रेल्वे 24 करोड रूपये मोजून तो पुन्हा नव्याने बांधला जाणार आहे. हा पूल ताडदेव, नागपाडा, भायखळा, ग्रँट रोड आणि जवळपासच्या भागांना जोडतो. या भागाला मुंबई सेंट्रल मधून जोडला जातो. 1839 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल 380 मीटर लांब आहे आणि आता तो 100 वर्षांपेक्षा जुना आहे.
मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव सेंट्रल जंक्शन असे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. दरम्यान ताडदेव सर्कल ते नवजीवन जंक्शन या पट्टे बापूराव मार्गावर पार्किंग नसेल असेही वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुलाच्या जागी एक केबल-स्टेड स्टील पूल बांधला जाण्याची शक्यता आहे. ज्याची रचना शहराच्या सतत वाढत्या रहदारीच्या मागणीसाठी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, या पुलावर दररोज 25 ते 30 हजार वाहनचालकांची वर्दळ असते. (हेही वाचा, BEST Complet 150 Years: बेस्टला 150 वर्षे पूर्ण! मुंबईकरांना प्रदर्शनातून अनुभवता येणार आजपर्यंतचा ट्राम युगचा इतिहास (Watch Video).
मुंबई मध्ये अनेक जुने आणि मोडकळीस आलेले पूल आहेत. वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार,अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै 2018 मध्ये कोसळला होता. त्यानंतर मुंबईतील जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. गोखले पूल कोसळल्यानंतर आयआयटी मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांमार्फत मुंबईतील सर्व पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडला जोडणारा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते.