मुंबई शहरामध्ये प्रथमच संपूर्ण लोकल रेल्वे (Locak Train) एका खासगी कार्यक्रमासाठी बुक करण्यात आली आहे. प्रसिद्ध आयरिश बँड यू 2 (The Irish band U2) प्रथमच भारतात आपली कला सादर करत आहे, व रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. ही लोकल रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमास प्रवाशांना घेऊन जाणार आहे. हा कॉन्सर्ट नवी मुंबई येथे आहे, त्यामुळे पश्चिम मार्गावरून, मध्य उपनगर मार्गे नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही लोकल रेल्वे घेऊन जाईल. अंधेरी ते नेरूळ दरम्यान खास ही चार्टर्ड लोकल चालवली जाईल.
ही विशेष गाडी अंधेरी येथून 15 डिसेंबर, रविवारी दुपारी 2.55 वाजता सुरू होईल. पुढे दुपारी 3.10 वाजता माहीम आणि कुर्ला येथे दुपारी 3.20 वाजता थांबेल. नेरुळहून परतीचा प्रवास रात्री 10.50 वाजता सुरु होईल. मुख्य म्हणजे फक्त या कार्यक्रमासाठी वैध पास असलेल्यांनाच या ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. Rock legends Bono, Larry, Adam Clayton आणि The Edge हे 1976 पासून आपल्या यू 2 बँडने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आले आहेत. आता हा बँड मुंबईमध्ये परफॉर्म करणार आहे. (हेही वाचा: खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार)
बुक माय शो (BookMyShow) हे यू 2 च्या भारतातील मैफिलीचे अधिकृत तिकीट भागीदार आहेत. त्यांनीच यू 2 च्या मैफिलीसाठी चाहत्यांसाठी एक विशेष ट्रेन आणि एक हेलिकॉप्टर सवारी जाहीर केली आहे. खास या कार्यक्रमासाठी स्टेडीयमपर्यंत शहराच्या आसपासच्या भागातून पिक-अप आणि ड्रॉप बस सेवादेखील उपलब्ध आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे.