मुंबई: अल्पवयीन मुलीचा पतीकडून लैंगिक छळ, भावाकडून बलात्कार तर आईनेच ढकलले वेश्याव्यवसायात; 5 जणांना अटक
Physical Torture | File Image (Representational Image)

मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीचा छळ, वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलण्याच्या तसेच बलात्कर आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली 5 जणांना अटक झाली आहे. यामध्ये पीडितेच्या आई, नवरा आणि भावाचाही समावेश आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2018 मध्ये जबरदस्तीने पीडितेचा विवाह करण्यात आला होता.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिला पतीकडून लैंगिक छळाचा त्रास होता. त्यानंतर ती मानखुर्दला आईकडे रहायला आली. काही महिन्यानंतर आईने जबरदस्तीने मुलीवर वेश्याव्यवसायात जाण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी तिला 60 वर्षीय वृद्धासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. अनेकांकडून लैंगिक छळ करण्यात आल्याची तक्रारदेखील करण्यात आली आहे. 'आई' शब्दाला काळिमा; आईच्या संमतीने तीन वर्षाच्या मुलीवर, दोघांचा तब्बल 10 दिवस लैंगिक अत्याचार

पीडितेने जेव्हा मदतीसाठी भावाकडे धाव घेतली तेव्हा त्याच्याकडूनही बलात्कार करण्यात आला. तसेच जीवे माराण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून लैगिंक छळ, बलात्काराची तक्रार करण्यात आली आहे. अद्याप 60 वर्षीय वृद्धाला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे.