मुंबईमधील सायन उड्डाणपुलाच्या (Sion Flyover) दुरुस्तीचे काम 14 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे, जे 26 एप्रिलपर्यंत चालेल. यादरम्यान उड्डाणपुलाची बेअरिंग्ज बदलली जातील. या दुरुस्तीच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यात गुरुवार, 27 फेब्रुवारीपासून उड्डाणपूल पाच दिवस बंद राहणार आहे. गुरुवार संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवार 2 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत सायन उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णतः बंद राहील.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटके यांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक शाखेतर्फे 8 ट्रॅफिक ब्लॉकला मान्यता देण्यात आली आहे.
सायन फ्लायओव्हर हा दक्षिण मुंबईतील एक महत्वाचा उड्डाणपूल असून, जो मुंबईला ठाणे, वाशी आणि इतर उपनगरांशी जोडण्याचे काम करतो. नुकतेच या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम 14 ते 18 फेब्रुवारीदरम्यान चालले. आता दुसरा टप्पा 27 फ्रेब्रुवारीपासून सुरु होत आहे. जो 2 मार्च पर्यंत चालेल. या उड्डाणपुलावरून रोज शेकडो वाहनांची ये-जा सुरु असते, त्यामुळे आता काही दिवसांसाठी हा पूल बंद राहणार असल्याने, वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
या दिवशी असतील ट्रॅफिक ब्लॉक
20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी
27 फेब्रुवारी ते 2 मार्च
5 मार्च ते 9 मार्च
12 मार्च ते 16 मार्च
19 मार्च ते 23 मार्च
26 मार्च ते 30 मार्च
2 एप्रिल ते 6 एप्रिल
एमएसआरडीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार उड्डाणपूल पहिल्या ब्लॉक दरम्यान पूर्णपणे बंद राहील, तर इतर सात ब्लॉकमध्ये पूर्वनिर्धारित वेळेनुसार दुरुस्तीचे काम केले केले जाणार आहे.
29 पिलरवर उभे असलेल्या सायन उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी 170 बेअरिंग्ज वापरली गेली आहेत. दुरुस्तीदरम्यान, 106 जॅकच्या मदतीने 170 बेअरिंग्ज बदलली जातील. शशिकांत यांच्या मते, बेअरिंग्ज बदलण्याचे काम 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिलदरम्यान चालेल. यानंतर उड्डाणपुलाचे एक्सपेंशन जॉइंट बदलने आणि डांबरीकरण यामुळे, 6 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान उड्डाणपुलांवरील वाहनांची वाहतूक 20 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. (हेही वाचा: मुंबई: महाराष्ट्र राज्य सडक विकास प्राधिकरणाकडून वांद्रे-वरळी सीलिंकवर फास्टॅग सुरु)
दरम्यान, 1999 मध्ये एमएसआरडीसीने सायन उड्डाणपूल बांधला. 2017 मध्ये आयआयटी बॉम्बेने उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. आयआयटीने आपल्या अहवालात उड्डाणपुल बेअरिंग्ज बदलण्याची शिफारस केली होती.