बदलापूरमध्ये शाळकरी मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेतही मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई मध्ये एका पालकाने तिच्या मुलीला शाळा परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने इंजेक्शन दिल्याची तक्रार केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 31 जानेवारीची आहे. दरम्यान आता पालकांच्या तक्रारीवरून आता तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 5 टीम्स बनवल्या आहेत. शाळेच्या परिसरामधील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं आहे यामधील फूटेज प्रमाणे कोणतीही संशयास्पद व्यक्ती आत किंवा बाहेर गेलेली नाही.
तक्रारीमध्ये पीडीत मुलीला इंजेक्शनच्य माध्यमातून काही अज्ञात पदार्थ दिल्याचं समजते पण यामध्ये पीडीतेसोबत कोणत्याही अत्याचाराच्या गोष्टीचा उल्लेख नाही. दरम्यान मुलीची प्रकृती स्थिर असून इंजेक्शन नंतर तिला कोणताही त्रास झालेला नाही. पोलिस सध्या या घटनेत लक्ष देत आहे. याबाबतचे अधिक आणि सविस्तर तपशील येणं बाकी आहे. नक्की वाचा: Student Stabs Two Classmates In Mumbai: मुंबईतील सायन कोळीवाडा शाळेत बँचवर बसण्यावरून वाद; विद्यार्थ्याने 2 वर्गमित्रांवर केला चाकूने वार.
वांद्रे टर्मिनस वर कुलीकडून महिला प्रवाशीवर अत्याचार
महिलांमध्ये असुरक्षितपणा वाढत असल्याची अनेक घटना मागील काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. नुकतीच वांद्रे टर्मिनस वर एका महिलेवर ती रिकाम्या ट्रेन मध्ये एकटीच झोपलेली पाहून कुलीने अतिप्रसंग केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारीवरून सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीला गजाआड केल्याचंसमोर आलं आहे. वांद्रे टर्मिनस सारख्या सतत वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर अशी घटना घडावी यावरून महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.