
लॉकडाऊन दरम्यान मुंबईच्या (Mumbai) धारावी येथील एका मंदिराच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची घटना समोर आली होती. आता याप्रकरणी या 43 वर्षीय आरोपीला विशेष पॉक्सो न्यायालयाने 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 22 जुलै 2020 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, पिडीत मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने त्याला हाक मारली आणि मंदिर परिसरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. मुलगा आरडाओरड करू लागला तेव्हा आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
थोड्या वेळाने कोणीतरी जवळ येत असल्याचे लक्षात आल्यावर आरोपी पळून गेला. मुलाने घरी पोहोचून घडलेला प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी व्यक्तीला तीन दिवसांनंतर अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी सहा साक्षीदारांची साक्ष घेतली. यामध्ये मंदिराच्या पुजाऱ्याचा पुतण्याने घटनेवेळी पीडित आणि आरोपीला अर्धनग्न अवस्थेत पाहिले होते. हा साक्षीदार आरोपीचा नातेवाईक आहे नी आरोपी त्यांच्यासोबत राहत होता. या साक्षीदाराने सांगितले की, जेव्हा त्याने या दोघांना त्या अवस्थेमध्ये पहिले, तेव्हा त्याने आरडाओरड केला व त्यानंतर आरोपी कपडे घालून पळून गेला. आरोपीने या दाव्याला विरोध केला मात्र न्यायालयाने तो दावा फेटाळून लावला. ब्यायालयाने आरोपीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. (हेही वाचा: Madhya Pradesh News: तरुणीवर लैंगिक अत्याचार करूण बेदम मारहाण, आरोपीच्या घरावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर)
दरम्यान नुकतेच नवी मुंबई येथे आपल्या सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथे चार वर्षांपासून आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या 42 वर्षीय वकिलाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मंगळवारी आरोपीला अटक करण्यात आली.