शेअर बाजार (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी होत असताना आज (26 नोव्हेंबर) शेअर बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली आहे. सेन्सेक्सने आज मागील काही दिवसांपासून विक्रमी उसळ पहायला मिळाली आहे. दरम्यान आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 41 ,022.85 अंकावर उघडला आहे. यंदा पहिल्यांदाच सेन्सेक्सने 41 हजारांचा टप्पा केला आहे त्यामुळे शेअर बाजारात उसळी बघायला मिळाली आहे. सेंसेक्सप्रमाणे निफ्टी देखील आशादायक आहे. निफ्टीच्या अंकांमध्ये आज 36.45 अंकांनी वाढ झाली आहे. आज निफ्टी 12,110.20 अंकांवर उघडला आहे.

अमेरिका, चीन यांच्यातील व्यापर संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्याने कालपासून आशियामध्ये तेजीत आहे. त्याचा परिणाम आता हळूहळू भारतीय शेअर बाजारावरही परिणाम दिसायला लागले आहेत. चीन, जपान, कोरिया या देशांमध्ये शेअर बाजार वधारल्याचे चित्र आहे त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला आहे.

ANI Tweet  

आज सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ज्या गुंतवणुकदारांनी रस दाखवला, त्यात येस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी आणि सन फार्मा यांचा समावेश होता. तर शेअर बाजारात आज भारती एअरटेल, पावरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक आणि एलअँडटी मध्ये घसरण पहायला मिळाली आहे.