School Buse | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com

मुंबईमध्ये सध्या वेगवान गाडी चालवल्याने अनेक अपघात घडल्याच्या घटना या घडल्याचे समोर आले आहे. सांताक्रुज परिसरात झाला. सांताक्रुज पश्चिमेकडील मॅनोर इंटरनॅशनल स्कूलची ही बस असून भरधाव वेगात असल्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात बस चालकासह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. यात चार विद्यार्थी आणि बसमधील आया हिचा देखील समावेश आहे. (हेही वाचा -  Pune Drugs Case: पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक)

या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याची माहिती मिळाली आहे. सध्या जखमींवर सांताक्रुज येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पालकांनी वाकोला पोलीस ठाण्यात चालका विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. या वाहन चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. वाहन चालकाने गाडी चालवताना मद्यपान केले होते का? याबाबत वाकोला पोलीस तपास करत आहेत. मात्र वाहन चालकाकडून झालेल्या या अपघातामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.