Mumbai: दुबई येथून एक 60 वर्षीय वृद्ध त्याच्या मुलीसह 29 एप्रिलला मुंबईत आले. तर वृद्धाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र मुलीने त्यांना क्वारंटाइन मध्ये ठेवल्यानंतर कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तरीही वडीलांना आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुद्धा केली. त्यामुळे आता या दोघांच्या विरोधात पवई पोलीस स्थानकात FIR दाखल कऱण्यात आला आहे. महापालिकेने क्वारंटाइन संदर्भात जाहीर केलेल्या गाइडलाइन्स नुसार, जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास म्हणजेच युरोप, मिडल ईस्ट,साउथ अफ्रिका आणि ब्राझील येथून येतील त्यांना सात दिवस इंस्टिट्युशन क्वारंटाइन रहावे लागणार असे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या के ईस्ट वॉर्डाचे मेडिकल ऑफिसर डॉ. एनआर तिवारी यांनी या दोघांच्या विरोधात पोलीसात 29 एप्रिलला तक्रार केली. ते दुबई येथून आल्यानंतर त्यांना इंस्टिट्युशन क्वारंटाइनसाठी अंधेरी ईस्ट येथील एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. सातव्या दिवशी त्यांची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे नियमानुसार डॉक्टरांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करत त्यांना जीटी रुग्णालयात पाठवल्याचे डॉ. तिवारी यांनी सांगितले. मात्र यावर त्यांची मुलगी तिने वडीलांना घरीच क्वारंटाइन करावे कारण त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नाहीत असे बोलायला लागली.(चिंताजनक! Covid-19 च्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळण्याची शक्यता; CM Uddhav Thackeray यांनी दिले 'हे' निर्देश)
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी असे म्हटले की, तिला वडीलांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी तिला रुग्णालयातील काही प्रक्रिया करण्यासाठी बोलावले. मात्र मुलगी हॉटेलमध्ये आली आणि वडीलांना रुग्णालयात दाखल करण्याऐवजी ती त्यांना घेऊन जाण्यास निघाली. तेव्हा तिला पॉझिटिव्ह रुग्णाला घेऊन जाण्यास परवानगी नसल्याचे ही सांगितले गेले. मात्र तिने नंतर सर्वांनाच शिवीगाळ करत ही प्रोसेस एक घोटाळेबाज असल्याचे म्हटले असे तिवारी यांनी सांगितले.