मुंबई पोलीस आता घोड्यावरून घालणार गस्त; नवीन मांउटेंड कॅाप्स पथकाची स्थापना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

सध्या देशातील तणाव पाहता, काल तातडीने मुंबई पोलीस महासंचालक आणि मुंबई आयुक्त यांची पदे भरण्यात आली. आता जनतेला संरक्षण देण्यासाठी मुंबई पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करतात याचे अनेक उदाहरणे आपण पहिली आहे. आता येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई पोलीस दलात 38 घोडेस्वारांचा समावेश होणार आहे. मांउटेंड कॅाप्स असे या दलाला म्हटले जाते. मुख्यत्वे गस्त घालण्यासाठी या घोडेस्वारांना सामील करून घेतले जाणार आहे. त्याचसोबत आक्रमक जमाव पांगविणे, गर्दीवर गर्दीमधूनच बारीक लक्ष ठेवणे यांसारखी कामेदेखील हे लोक करणार आहेत. सरकारकडून यासाठी त्यासाठी 1 कोटी 99 लाख 30 हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात गस्त घालण्यासाठी घोद्यांचाच वापर होत असे. अजूनही भारतात कोलकाता आणि म्हैसूर येथे अशा प्रकारचे घोडेस्वार आढळतात. याच धर्तीवर मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. लवकरच पथकासाठी 30 उमद्या घोड्यांची खरेदी करण्यात येईल. घोड्यांसाठी पागा व त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येणार आहे. माउटेंड कॅाप्स पथकात 1 पोलीस निरिक्षक, 1 सहायक पोलीस उपनिरिक्षक, 4 पोलीस हवालदार, व 32 पोलीस शिपाई असे एकूण 38 कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. (हेही वाचा: मुंबई पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जैसवाल तर मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती)

सुरुवातीला क्लीन येथील कोळे कल्याण येथे या घोड्यांना ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला गृहभिगाने परवानगी दिली आहे. आता हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्यास मंजुरी मिळाली की, पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. यासाठी पोलिसांना खास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.