मुंबई: रोलेक्स, स्विस सारख्या नामांकित कंपन्यांची 1 कोटींची बनावट घड्याळे जप्त, मुंबई पोलिसांनी पायधुनी येथील ऑफिसात टाकला छापा
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

आपल्या मनगटावर चांगल्या कंपनीचे महागडे असे घड्याळ (Wrist Watch) असावं असं अनेकांचे स्वप्न असतं. किंबहुना ब-याच लोकांना तसे करण्याचा छंदही असतो. मात्र अशा नामांकित कंपनीचे घड्याळ वापरणा-यांनो जरा सावधान! कारण मुंबईत राडा, रोलेक्स, स्विस अशा नामांकित घड्याळ कंपन्यांची तब्बल 1 कोटींची बनावट घड्याळे जप्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकसत्ता ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सारंग स्ट्रीट, पायधुनी येथील एका ऑफिसमध्ये छापा टाकत केल्विन क्लिन, फास्ट ट्रॅक, फॉसिल्स, रोलेक्स, राडो या आणि इतर नामांकित कंपन्यांची 5,281 घड्याळं जप्त केली आहेत. तसेच या ऑफिस मालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करत आहेत.

17 सप्टेंबरला गुन्हे शाखेने राडा, रोलेक्स, स्विस, फास्ट ट्रॅक अशा नामांकित कंपन्यांची बनावट घड्याळं, घड्याळांचे स्पेअर पार्ट, साहित्य असा एकूण 20 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटकही करण्यात आली. हेही वाचा- बिहार मध्ये छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच पोलिसांकडून अटक

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही घड्याळं बनावट आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहिरात करुन ती मुंबई, महाराष्ट्र आणि इतर राज्यात विकली जातात. त्यामुळे या सर्व प्रकाराचा खरा सूत्रधार कोण याचा तपास पोलीस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी गोव्यात एका तरुणाकडून तब्बल 1 कोटी 99 लाख 92 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हा तरुण नवीन पनवेल येथील रहिवासी असून लवू चव्हाण असे त्याचे नाव आहे. हा तरुण करमळी ते लोकमान्य टीळक टर्मिनस उन्हाळी विशेष गाडीतून प्रवास करत होता. त्याच्याकडे जून्या नोटा आढळून आल्याने थिवी रेल्वे स्थानकात कारवाई करण्यात आली होती.