खळ्ळ.. खटॅकची मनसेची (MNS) भाषा प्रत्यक्षात उतरवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन नांदगावकर (NitinNandgaonkar) यांना मुंबई पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. यामध्ये पुढील दोन वर्षांसाठी नितीन नांदगावकरांना तडीपार करण्यात आल्याची नोटीस दिल्यानंतर मनसेसह नितिन नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितिन नांदगावकर यांनी फेसबुकच्या माध्यामातून एक खास व्हिडिओ शेअर करत त्यांची बाजू मांडली आहे. यामध्ये लोकांना माझी खरंच भीती वाटतेय का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियातून प्रतिक्रिया येण्यास सुरू झाली आहे. यामध्ये #ISupportNitinNandgaonkar हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
काही दिवसांपूर्वी बीकेसी भागामध्ये रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी नितीन नांदगावकर यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली होती. तसेच यापुर्वी देखील अनेक प्रशासन अअणि सामान्य नगरिकांमधील लहान सहान समस्यांवर तोडगा मिळवण्यासाठी नितिन नांदगावकरांनी मारहाण करण्यात आल्याचे अनेक व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले होते. याप्रकारानंतर मुंबई पोलिसांनी कायदा हातात घेतल्याचं सांगत नितिन नांदगावकरांना तडीपारीची नोटीस बजावली आहे.
नितीन नांदगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत. नितीन नांदगावकर यांना बजावलेल्या नोटिसीमध्ये त्यांना मुंबई, उपनगरांप्रमाणेच , ठाणे, पालघर या भागात तडिपार केलं आहे. तसेच त्यांना एका कार्यकारिणी समितीसमोर आपली बाजू मांडायला वेळ दिला आहे.