Theft (Representative Image- File)

सध्याच्या काळात पैसा इतका महत्त्वाचा झाला आहे की त्यासाठी लोकांची काहीही करायची तयारी असते. मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे एका 32 वर्षीय इसमाने ऑनलाईन शॉपिंगच्या (Online Shopping Fraud) नावाखाली लोकांकडून लाखो पैसे उकळून लोकांना लाखोंचा गंडा घालणा-या आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपीने गंडा घातलेल्या लोकांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय हा इसम ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली जवळपास 22,000 लोकांना फसवले होते. यात त्याने 70 लाखांहून रुपयांचा गंडा घातला आहे. यात महिलांचा समावेश अधिक आहे. पोलिस या आरोपीची चौकशी करुन त्याच्याकडून अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे.हेदेखील वाचा- Nashik: मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वडील आणि सावत्र आईला अटक

अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करणे ही कोणाची गरज, कुणाचा शौक तर कुणाची आर्थिक चणचण हे यामागचे कारण असते. दरम्यान अलीकडेच पुण्यातील (Pune) एका व्यक्तीने बायकोला खूश करण्यासाठी चोराचा मार्ग अवलंबला. रोहन बिरु सोनटक्के (21) असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसंच त्याच्याकडून तब्बल 13 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकसत्ताने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.